इंस्टाग्राम वर स्टोरी ठेवून युवकाने संपवले जीवन ;

नाशिक: सिडकोतील पवन नगर परिसरात एका 23 वर्षीय युवकांने इंस्टाग्राम वर स्वतःच्या फोटोची स्टोरी ठेवून, त्यावर RIP लिहून गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना घडली. रोशन सुभाष वाघ (वय 23, रा.पवन नगर सिडको ) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. रोशन यांने गुरुवारी दिनांक 29 रोजी घरात कोणी नसताना गळफास घेतल्याचे आढळून आले.

 

 

मिळालेल्या माहितीनुसार, रोशन हा त्याच्या आई सोबत सिडको येथे राहत होता. रोशनच्या वडिलांचे चार ते पाच महिन्यांपूर्वी अपघाती निधन झालं होतं. उदरनिर्वाहासाठी तो रिक्षा चालवत होता. गुरुवारी आई दुपारी कामानिमित्त घराबाहेर गेल्यानंतर, रोशन इंस्टाग्राम वर स्वतःच्या फोटो ची स्टोरी ठेवून आपले आयुष्य संपवलं. ही स्टोरी त्याच्या बहिणीने बघितल्यानंतर तिने रोशन सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो झाला नाही त्यानंतर नातलकांनी घरी जाऊन पाहणी केली असता रोशन गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. अंबड पोलीस ठाण्यात या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

🤙 9921334545