कोल्हापूर : राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. या पुतळ्याचे बांधकाम सल्लागार डॉ.चेतन एस पाटील (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांच्यावर मालवण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला होता.
चार दिवसापासून मालवणचे पोलीस पथक चेतन पाटील यांच्या अटकेसाठी कोल्हापुरात दाखल झाले होते. आज मध्यरात्री तीन वाजता चेतन पाटील यांना ताब्यात घेण्यात आले.
शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमवार (दिनांक 26 )पासून डॉक्टर चेतन पाटील यांचा मोबाईल स्विच ऑफ होता. डॉक्टर चेतन पाटील यांची पत्नी, आईसह त्यांच्या काही मित्राकडेही संपर्क साधून चौकशी केली होती. मात्र त्यांचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता. अखेर मध्य रात्री चेतन पाटील यांना ताब्यात घेण्यात आले.