कोल्हापूर: येवती (ता.करवीर) येथील पाच वर्षाची आलिना फिरोज मुल्लाणी ही स्कूल बस मधून खाली उतरली आणि बसच्या धक्क्याने बसच्या चाकाखाली सापडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आलिना हि इस्पुर्ली येथे दूधगंगा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलच्या बसमधून शाळा सुटल्यानंतर घरी येत होती. येवती गावातील दिगंबर आळवेकर यांच्या दुकानाजवळ बस थांबली. त्यावेळी बसमधून खाली उतरून ती आपल्या घराकडे जात होती. स्कूल बस चालकाला अंदाज न आल्याने त्याने बस सुरू करून पुढे नेली, त्यावेळी त्या बसचा आलिनाला पाठीमागून जोरात धक्का बसल्याने, ती रस्त्यावर पडली आणि बस तिच्या अंगावरून गेल्याने ती गंभीर जखमी झाली नागरिक व तिच्या नातेवाईकांनी तिला दुचाकीवरून इस्पुर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले तिची अवस्था पाहून डॉक्टरांच्या सल्ल्याने तिला कोल्हापुरातील सीपीआर मध्ये नेले. पण उपचार सुरू होण्यापूर्वी तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
पोलिसांनी स्कूल बस चालक नवनाथ मोहोळ लोंढे (वय31, रा.सोनगे, ता.कागल) याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला.