शहाजी महाविद्यालयात क्रीडा दिन उत्साह संपन्न ;

कोल्हापूर प्रतिनिधी :संग्राम पाटील

दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ऑलिंपिक व भारत या विषयावर भितीपत्र प्रकाशन व माननीय संभाजी ज्ञानदेव पाटील रयत शिक्षण संस्था सातारा यांचे व्याख्यान घेण्यात आले. यावेळी त्यांनी ग्रीक पासून ते पॅरिस ऑलिंपिक पर्यंतचा इतिहास उलगडला. त्यामध्ये त्यांनी भारत ऑलिंपिक मध्ये कुठे आहे त्याचेही उदाहरणासह स्पष्टीकरण दिले. व नवीन उधळून खेळाडूंना पुढील ऑलिंपिक ध्येय कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केले.

 

अध्यक्षिय भाषणात प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण यांनी ऑलिंपिक मधील नवनवीन उदाहरण देऊन विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने खेळाचे संस्कृती जोपासावी व वाढवावी याबद्दलचे मार्गदर्शन केले.

तत्पूर्वी ऑलम्पिक व भारत या विषयावरील भितीपत्रकात खेळाडूंनी ऑलिंपिक बद्दलचा इतिहासापासून पॅरिस ऑलम्पिक च्या पदक विजेतेचे माहितीपर्यंत सर्व भित्तिपत्रके तयार करण्यात आली होती त्याचबरोबर ऑलम्पिक चे बोधचिन्ह व त्याची माहिती ही प्रदर्शित करण्यात आली होती.

कार्यक्रमाचे नियोजन जिमखाना प्रमुख डॉ प्रशांत पाटील व प्रशांत मोटे यांनी केले. या कार्यक्रमास श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग विजयराव बोंद्रे, प्राचार्य डॉ आर के शानेदिवाण यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे नेक समन्वयक आर डी मांडनीकर, सहसमन्वयक डॉ ए बी बलुगडे, रजिस्टर रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले तसेच प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

🤙 9921334545