मुंबई : मुंबईच्या विक्रोळी परिसरात श्वानांना सांभाळणाऱ्या तरुणावर एका श्वानाने हल्ला केला. श्वान पथकालाही ग्रेट डेन जातीचा हा श्वान आवारता आला नाही. या हल्ल्यांमध्ये तरुणाचा मृत्यू झाला. हसरत अली असे या तरुणाचे नाव आहे.
मुंबईमध्ये विक्रोळी येथे गोदरेज कंपाउंड मध्ये मार्शल डॉग या श्वान प्रशिक्षण कंपनीत हसरत अली हा ग्रेट डेन जातीच्या श्वानांना कंपनीच्या आवारात घेऊन फिरण्याची काम हा करत होता.
मात्र श्वानाने हसरत अली वर अचानक जीवघेणा हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच, पोलीस ,पालिकेचे श्वान पथक आणि काही प्राणी मित्र घटनास्थळी दाखल झाले. श्वानाला हसरत अलीपासून लांब करण्याचा ते प्रयत्न करत होते. तीन तासांनी हसरत अलीला या श्वानाच्या तावडीतून सोडवण्यात यश आलं. त्यानंतर त्याला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र गंभीर जखमी झालेल्या हसरत अली चा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मारुतीची बातमी त्याच्या कुटुंबियांना कळ्वण्यात आली. अलीच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूच्या बाबतीत संशय व्यक्त केला आहे.