दिल्ली: भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे नेते ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील लैंगिक छळाची प्रकरणाची एफ आय आर रद्द करण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यांच्या याचिकेवर आणि एफ आर रद्द करण्याच्या मागणीवर उच्च न्यायालयाने ताकीद दिली.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 26 सप्टेंबर रोजी आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ब्रिजभूषण सिंह यांना कारवाईला आव्हान द्यायचे होते, तर त्यांनी सुरुवातीलाच खटला सुरू होण्यापूर्वी तसे करायला हवं होतं.