शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर : 2 सप्टेंबर पासून दौरा सुरू

कोल्हापूर  :   राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे तीन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. २ सप्टेंबर पासून हा दौरा सुरू होणार असून, ४ सप्टेंबरला कोल्हापुरात त्यांचा मुक्काम आहे. राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या सांगली येथील कार्यक्रमाला ५ सप्टेंबर रोजी शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

 

 

शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजीतसिंह घाडगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश निश्चित झाला आहे. 3 सप्टेंबरला कोल्हापुरात गैबी चौकात होणाऱ्या जाहीर सभेत शरद पवार यांच्या उपस्थितीत समरजीत सिंह घाडगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश होणार आहे. याशिवाय अन्य काही नेतेही पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांचा 3 सप्टेंबर रोजी कोल्हापुरात मुक्काम असून, ४ सप्टेंबरला दसरा चौकातील शाहू स्मारक येथे त्यांच्या हस्ते प्रकल्पग्रस्त धरणग्रस्तांचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांच्या यांचा अमृत महोत्सवी सत्कार होणार आहे. यानंतर ते सातारा जिल्ह्याकडे रवाना होतील. 5 सप्टेंबरला ते सांगलीत सोनहिरा साखर कारखान्यावर होणाऱ्या कै. पतंगराव कदम यांच्या स्मारक उद्घाटन समारंभास उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाला काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे.