कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात, समरजीतसिंह घाटगे यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली!

कोल्हापूर: विधानसभा निवडणूक पूर्वी भाजपचे नेते समरजीत घाटगे हे राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसापासून होती या चर्चेवर आज झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यात आला
समरजीत घाटगे यांच्या कार्यकर्त्याच्या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते .

या पक्षप्रवेशासाठी शरद पवार स्वतः कागल मध्ये येणार असून 3 सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता गर्दी चौकात हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे.जयंत पाटील यांनी आपल्या भाषणातून समरजीत घाटगे यांच्या कार्यकर्त्यांना पक्षप्रवेशाबाबत विचारणा केली असता कार्यकर्त्याकडून सहमती येतातच पक्षप्रवेशाच्या सोहळ्याची तारीख सुद्धा त्यांनी जाहीर करून टाकली त्यानंतर घाडगे यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष करण्यात आला.

🤙 9921334545