एस. टी. कर्मचारी यांचा राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा !

मुंबई :राज्य शासन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे, या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचारी ०३ सप्टेंबरपासून म्हणजेच गणेशोत्सव काळात आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. एस. टी. कर्मचारी कृती समितीच्या राज्यस्तरीय बैठकीत सरकारला गंभीर इशारा देण्यात आला असून एस. टी. कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यास गणेशोत्सवकाळात प्रवाशांचे होणार हाल होणार असल्याचे चित्र आहे.

राज्यातील एसटी कर्मचारी संघटनाच्या कृती समितीची आज बुलढाणा येथे बैठक झाली.त्यामुळे राज्य सरकारने आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या, असा इशाराही कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

🤙 9921334545