राज्य सरकारने घेतली लाडक्या बहिणींच्या तक्रारीची घेतली दखल

मुंबई :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण  योजनेसाठी आतापर्यंत साधारण दोन कोटींपेक्षा अधिक महिलांनी अर्ज केले आहेत. महिलांना या योजनेच्या माध्यमातून महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान, आतापर्यंत अनेक महिलांना लाडकी बहीण योजनचा लाभ मिळाला असला तरी अनेक महिलांना पैसे मिळालेले नाहीत. वेगवेगळ्या चार्जेस अंतर्गत महिलांच्या बँक खात्यावर जमा झालेले पैसे संबंधित बँका कापून घेत आहेत. राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रतिमहिना 1500 रुपये या हिशोबाने पात्र महिलांच्या बँक खात्यावर पैसे टाकले आहेत, पण अनेक महिलांना मात्र ही संपूर्ण रक्कम मिळालीच नाही. . याच अडचणीची राज्य सरकारने दखल घेतली आहे.

याच कारणामुळे अनेक महिलांनी आम्हाला बँक पैसे देण्यास नकार देत, असल्याची तक्रार केली. तर काही महिलांनी आम्हाला लाडकी बहीण योजनेची संपूर्ण रक्कम मिळालीच नाही, असे सांगितले होते. राज्य सरकारने महिलांच्याच याच अडचणींची दखल घेतली आहे. राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने बँकांना याबाबत सूचना दिल्या आहेत.

🤙 9921334545