कोल्हापूर: पेठवडगाव येथील विजयसिंह यादव कॉलेजवर बॉम्ब ठेवला असल्याचा पोलिसांना फोन आला.पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेत महाविद्यालय रिकामे केले, तसेच परिसरातील नाकाबंदी सुद्धा केली. घटनास्थळी एटीएस व बाॅम्बशोधक पथक कॉलेज परिसरात शोध घेतला. मात्र ही अफवा असल्याचे समोर आले.
या घटनेची पोलिसांना माहिती मिळताच पोलीस यंत्रणा एक्शन मोडवर येत, अवघ्या तीन ते चार मिनिटात कॉलेजमध्ये आले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सोडून देण्यास सांगितले. घटनास्थळी वडगाव पालिकेची अग्निशमन दल दाखल झाले.अवघ्या तासाभरात एटीएस व बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी दाखल होत, शोधकार्य सुरू केले.अखेर ही अफवा असल्याचे समोर येताच, सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.