महिला पत्रकाराविषयी अपशब्द वापरणाऱ्या वामन म्हात्रे वर कारवाई करण्यात यावी: कोल्हापूर प्रेस क्लब ची मागणी

कोल्हापूर: माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बदलापूर येथे महिला पत्रकाराला अपशब्द वापरून महिलावर्ग आणि पत्रकारितेचा अपमान केला.याचा निषेध म्हणून कोल्हापूर प्रेस च्या वतीने दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर निषेध करण्यात आला.वामन म्हात्रे वर कारवाई नाही झाल्यास, तीव्र आंदोलन छेडू असा इशारा अध्यक्ष शितल धनवडे यांनी दिला.

यावेळी निवास चौगुले,समीर मुजावर, गुरुबाळ माळी, लुमाकांत नलवडे, बी.डी.चेचर, अनिल देशमुख, मोहन मेस्त्री,सतीश सर्रीकर, भूषण पाटील, विजय केसरकर, आदित्य वेल्हाळ, पोपट पवार, रणजीत माजगावकर आदी पत्रकार ,फोटोग्राफर, मोठ्या संख्येने उपस्थित होते

🤙 9921334545