सांगली: मागील दोन महिन्यांपासून जिल्ह्यात सातत्याने पाऊस होत आहे. जुलै महिन्यात अतिवृष्टी झाली होती या पावसाचे प्रमाण पश्चिम भागात अधिक होते ,
ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी झाला . सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस होत आहे. वाळवा ,शिराळा तालुक्यासह पश्चिम भागातील काही गावात ढगांच्या कडकडासह सायंकाळी जोरदार पाऊस झाला.
हा पाऊस पिकांसाठी उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांच्यात समाधानाचे वातावरण दिसत आहे.