मुंबई: स्वप्निल कुसळे याने पॅरिस ऑलम्पिक मध्ये कांस्यपदक पटकावले. याबद्दल स्वप्निल कुसळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत, ‘मी पूर्वीही स्वप्निल कुसळे होतो आणि यापुढेही राहणार’ अशी विनयशील भावना त्याने व्यक्त केली.
मुंबईमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान स्वप्निल म्हणाला की, “मला रायफल थ्री पोझिशन प्रकारात सुवर्णपदक मिळवायचा आहे. त्यामुळे त्याच उद्देशाने सरावाला सुरुवात करणार आहे. चाहत्यांच्या नजरेतून मी आता प्रसिद्ध व्यक्ती झालो असलो ,तरी मी तसे मानत नाही . माझी देहबोली पूर्वी होती तशीच आहे आणि माझी जीवनपद्धती देखील बदललेली नाही . मी तोच स्वप्निल आहे , जो ऑलम्पिक पूर्वी होता. उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही करायचे हे ते प्रयत्न मी करणार आहे” असेही स्वप्निल न सांगितलं.