सांगली: सांगलीत बेकायदेशीर संदेश मनीलॉन्ड्रग व गॅम्बलिंगच्या तक्रारी आल्याची भीती घालून सांगलीतील महिला डॉक्टर शितल संजय पाटील यांच्याकडून विश्वास नांगरे पाटील बोलतोय असे सांगून तब्बल 15 लाख 50 हजार रुपये उकळल्याचा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी सुरेश कुमार दास हेमराज कोळी आणि विश्वास नांगरे पाटील नावाने बोलणारी व्यक्ती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित सुरेश कुमार दास या व्यक्तीने शितल पाटील यांच्याशी दहा दिवसांपूर्वी मोबाईल वरून संपर्क साधला डॉक्टर पाटील यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रीग .गॅब्लिंग आणि बेकायदेशीर मेसेजच्या 17 अधिक तक्रारी असून गुन्हा झाल्याची सांगितले. यावेळी विश्वास नांगरे पाटील बोलत आहेत, असे भासून एका भामट्याने डॉक्टर पाटील यांच्याशी संभाषण केले. यामुळे घाबरलेल्या महिलेने पाच लाख रुपये आरोपीच्या खात्यावर पाठवले. त्यानंतर कर्ज काढून बाकीचे पैसे भरले .फसवणूक झाल्याचे लक्षात येतात डॉक्टर पाटील यांनी सांगलीत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.