निवासी डॉक्टरांच्या संपामुळे सीपीआर ची आरोग्यवस्था कोलमडली

   कोल्हापूर: कोलकत्ता येथील आर.जी. कार महाविद्यालय व रुग्णालयात पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर वर बलात्कार करून तिचा खून केल्याचा निषेधार्थ निवासी आंतरनिवासी डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी आणि आंतर निवासी साडेतीनशे डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरूच ठेवल्याने सीपीआर ची आरोग्य व्यवस्था ठप्प करून ठेवली आहे. शंभराहून अधिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आले असून ,एकीकडे रुग्ण वाढत असताना त्यांच्यावर उपचारासाठी अपुरे डॉक्टर असल्याने वादावादीचेही प्रसंग घडत आहेत.
गेले आठवडाभर काम बंद आंदोलनामुळे वैद्यकीय सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे .