मुंबई: शिंदे सरकार अदानींच्या खिशात आणि मुंबई अदानीच्या खिशात अशी स्थिती असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी रविवारी धारावी येथे केली. धारावीकरांना धारावीतच घरी मिळाली पाहिजेत. धारावीचा पुनर्विकास व्हावा, अदानींचा नाही असे ही ते म्हणाले.
धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईतील संधी अदानीच्या घशात घालण्याचा डाव आहे .शिंदे सरकार आदानीचे नोकर आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यावर 500 चौरस फुटाचे घर सर्व धारावीकरांना पात्र ठरवून दिले जाईल .असे आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.