कोल्हापूर प्रतिनिधी: संग्राम पाटील
मिल्ट्री मध्ये जवानांना रक्षाबंधनच्या राख्या बांधून शिवसेना महिला आघाडी च्या वतीने रक्षाबंधन करण्यात आले. हे जवान ज्यावेळी देशाचं रक्षण करतात तीच खरी रक्षा आम्हा सर्वा बहिणींना व महिलांना देतात . तीच ओवाळणी म्हणून सर्व महिलांनी भावाला एकच मागणी केली की तुम्ही तुमची काळजी घ्या तुम्ही सुरक्षित आहात तर आम्ही सुरक्षित राहणार. याच आनंदी वातावरणात कार्यक्रम खूप सुंदर झाला.

उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वर्षा पाटील, रूपाली घोरपडे, असावरी सुतार, पल्लवी चिखलीकर व जयश्री मडीमगिरी उपस्थित होत्या.
