चोरट्यांची हुशारी; चोरीनंतर मागमुस न ठेवण्याचा प्रयत्न;

सांगली :सांगली जिल्ह्यातील हरिपूर येथे चोरट्याने बंद बंगला फोडला. त्यानंतर गव्हर्मेंट कॉलनीत ही बंद फ्लॅट फुटला. दोन्ही ठिकाणी चोरट्याने हातमोजे वापरले, तसेच श्वानाला चकवण्यासाठी चोरीनंतर सर्वत्र पाणी ओतून ठेवले. चोरीनंतर मागमुस न ठेवण्याचा हा प्रकार प्रथमच पोलीस पाहत आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा चक्रावली आहे.

पारधी समाजातील काही गुन्हेगार चोरीनंतर श्वान मागावर येऊ नये म्हणून वेगवेगळे प्रयोग करतात. आता बरेच गुन्हेगार दुचाकी, चार चाकीतून येऊन गुन्हे करतात आणि पळून जातात त्यामुळे श्वान घुटमळते. हरिपूर आणि गव्हर्मेंट कॉलनीत असाच. चोरीचा प्रकार घडला आहे त्यामुळे चोरटे सराईत असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

🤙 9921334545