मुंबई : ऑक्टोबर मध्ये बांगलादेशमध्ये महिला टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा होणार आहे . दरम्यान सद्यस्थितीत बांगलादेशात असंतोष पसरला आहे सध्या राजकीय अस्थिरता असून अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महिला टी-ट्वेंटी विश्वचषकाचे यजमान पद स्वीकारण्यास भारताने नकार दिला बीसीसीआयची सचिव जय शहा यांनी याबद्दल माहिती दिली.
दरम्यान बांगलादेश मधील सध्याची परिस्थिती पाहता महिला टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा होणार की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. बांगलादेश ऐवजी महिला टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा दुसऱ्या देशात खेळवला जाण्याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी भारत, श्रीलंका आणि युएई नाव समोर येत आहेत.भारतात क्रिकेटसाठी सर्वोत्तम सुविधा असल्याने तयारीला फारसा वेळ लागणार नाही म्हणून भारताच नाव घेतलं जात आहे.