बेपत्ता मुलीच्या शोध कार्यासाठी पोलिसांचा फौजफाटा

पुणे: 15 ऑगस्ट च्या रात्री साडे अकराच्या दरम्यान पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सह आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्यासह 100 ते 200 पोलिसासह कात्रज चौकात भेट दिली.

 

14 ऑगस्ट ला दुपारी गौरी पटेल (वय 10) ही मुलगी शिवतेज नगर बिबवेवाडी इथून बेपत्ता झाली होती. ही मुलगी मतिमंद असून बिबवेवाडी पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चेक केले असता ती कात्रज परिसरातून गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले 24 तास उलटूनही मुलगी मिळून येत नसल्याने पोलीस आयुक्त यांनी रात्रीच्या वेळी सर्व वरिष्ठ अधिकारी व पोलिसांना कडक सूचना देत शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश दिले. रात्री एकच्या सुमारास बेपत्ता मुलगी कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्विगी डिलीव्हरी करणाऱ्या मुलाला मिळवून आली व त्यांनी ती पोलिसांच्या ताब्यात दिली. मुलगी सुखरूप असून पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले कात्रज परिसरामध्ये अचानकच रात्रीच्या वेळी पोलीस आयुक्त सह एवढ्या पोलिसांचा फौजफाटा आल्याने नागरिकाकडून वेगवेगळे तर्क वितर्क लावण्यात येत असून नागरिक आश्चर्यचकित झाली होते.