पुणे : पुण्यातील हडपसर येथील एक नामांकित शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचे न्यूड फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले .
या विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या काही विद्यार्थिनीचे फोटो मिळवले आणि त्यानंतर मॉर्फ करत सोशल मीडियावर व्हायरल केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. दहावीत शिकणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.