कोल्हापूर:वारणा काठ सुपीक जमिनीचा काठ म्हणून ओळखला जातो. येथील शेतकरी चांगल्या पद्धतीने ऊस, सोयाबीन, भात, भुईमूग भाजीपाला पिकवतात .मात्र दर एक-दोन वर्षांनी महापुराचा फटका बसत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यावर्षी आलेल्या महापुराने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले आहे .
पिकांचे नुकसान पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे .महापूराचे पाणी तब्बल आठ दिवस शेतामध्ये राहिल्याने हाता-तोंडाशी आलेली पिकं अक्षरशः कुजून गेली आहेत.वारंवार पूर परिस्थिती निर्माण होत असल्याने शेती करणे अवघड बनले आहे. तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे. पुलासाठी टाकलेले भराव यामुळे महापुराची तीव्रता वाढत आहे याबाबत उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.