‘नागपुरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार’

नागपूर: नागपूर मधील वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याचा प्रकार समोर आला आहे.

साहिल सिद्धार्थ नितनवरे असे आरोपीचे नाव असून, ऑगस्ट 2021 मध्ये त्याची या अल्पवयीन मुलीची ओळख झाली .  तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून, धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी त्यांने फोटो व्हिडिओ काढले होते. त्यानंतर ते फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार तिच्यावर अत्याचार केला, तसेच मारहाण देखील केली . मुलीने या प्रकरणाची माहिती आपल्या पालकांना दिली, तिच्या आई-वडिलांनी त्या मुलाला जाब विचारला असता त्यांना देखील त्यांने धमकी दिली. त्यानंतर तिच्या आई-वडिलांना हे फोटो व्हिडिओ पोस्ट केले हा प्रकार समोर आल्यावर मुलीने वाडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे . पोलिसांनी आरोपी साहिल विरोधात पोकसो अक्ट तसेच आयटी अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे.