उच्च न्यायालयाकडून पूजा खेडकरला दिलासा

दिल्ली :बडतर्फ आयएएस अधिकारी पूजा खेडकर ने अटक पूर्व जामीन मिळावा यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पटियाला हाऊस न्यायालयाने पूजा खेडकर चा अटकपूर्व जामीन फेटायला होता . त्यानंतर तिने दिली उच्च न्यायालयात धाव घेतली, उच्च न्यायालयात पूजा खेडकर चा अटकपूर्व जामीनावर सुनावणी पार पडली .

या सुनावणीत 21 ऑगस्टपर्यंत पूजा खेडकर ला अटक न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना दिले. या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद याच्या खंडपीठांसमोर झाली .यावेळी, खंडपीठाने दिल्ली पोलीस आणि यूपीएससीला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 21 ऑगस्टला होणार आहे.