‘मराठा शांतता रॅली’ कोल्हापूर कडे रवाना

कोल्हापूर:मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत.नऊ ऑगस्ट रोजी कोल्हापुरातील हुतात्मा क्रांती स्तंभ मिरजकर तिकटी ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यत शांतता रॅली काढणार आहे.

 

शांतता रॅली नंतर मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा होणार आहे. आपल्या मुलांना शेतकऱ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर ज्या ठिकाणी रॅली होणार आहे ,त्या ठिकाणी काम बंद करून मराठा समाजाने एकत्र यावे. असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले या आवाहनाला समर्थन म्हणून सैनिक टाकळीतील असंख्य तरुण कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले.