कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील पारंपारिक मतदारसंघ असणाऱ्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघासह कोल्हापूर जिल्ह्यातील इतर पाच जागांवर निश्चित यश मिळेल असा ठाम विश्वास आज शिवसेना उपनेते व संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या शासकीय विश्रामधाम येथील सर्व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये करण्यात आला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दिनांक 4 ते 11 या कालावधीमध्ये भगव्या सप्ताहाच्या निमित्त आयोजित केलेले वेगवेगळे समाजपयोगी उपक्रम तसेच सभासद नोंदणी याचा आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आला. जनतेच्या प्रश्नांवरती सर्व स्तरावर लढत असताना लोकसभेप्रमाणेच घवघवीत यश उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला व महाविकास आघाडीला मिळेल, यासाठी सर्वच कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न करून जनतेपर्यंत शिवसेनाची ध्येयधोरण व मशाल चिन्ह पोहचवावे. असे आवाहन या बैठकीमध्ये करण्यात आले. या बैठकीला शिवसेना उपनेते जिल्हाप्रमुख संजय पवार, शिवसेना सह संपर्कप्रमुख विजय देवणे ,शिवसेनादक्षिण शहर प्रमुख रवीकिरण इंगवले, शहर समन्वयक हर्षल सुर्वे व विशाल देवकुळे, महिला आघाडी प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे, रवींद्र साळोखे, पोपट दांगट, अवधूत साळोखे, राजू यादव, विनोद खोत, मंजित माने, गोविंद वाघमारे, सागर साळोखे, विकी मोहिते, विक्रम चौगुले, दत्ता पाटील, रीमा देशपांडे, चेतन देशपांडे आदी उपस्थित होते.
