कोल्हापूर:कागल येथे नवीन शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व संलग्नित १०० रुग्णखाटांचे आयुर्वेद रुग्णालय स्थापन करण्याचे मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.राज्याच्या वैद्यकीय शिक्षण मंत्रिपदी हसन मुश्रीफ म्हणाले, की की माझ्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रुग्णालय यांसाठी निकषानुसार किमान ३ एकर जागा निश्चित केली आहे.
तसेच, महाराष्ट्र राज्यात योग व निसर्गोपचार पदवी अभ्यासक्रमाचे एकही शासकीय महाविद्यालय नाही. यास्तव उत्तुर, ता.आजरा, कोल्हापूर येथे ६० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व संलग्नित ६० रुग्णखाटांचे रूग्णालय स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचारात होती. नवीन शासकीय योग व निसर्गोपचार पदवी महाविद्यालय व रुग्णालयासाठी आवश्यक असणारी पदे उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने भरण्यास मान्यता देण्यात आले आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक तसेच अतिरिक्त बांधकाम करण्यास व त्यासाठी आवश्यक खर्चास मान्यता देण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.