कोल्हापूर :राज्यात एसटीने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे गाव ते शहर जोडणारी लाल परी प्रवाशांना मोठा आधार ठरते . राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासातील प्रवाशांचा ऑनलाईन व्यवहाराकडे कल वाढवू लागला आहे, त्यामुळे अनेक समस्या पैकी एक असलेल्या चिल्लर चा प्रश्न नवीन अँड्रॉइड तिकीट मशीन मुळे निकाली लागला आहे. त्यात महामंडळ डिजिटल होत असल्याने प्रवाशांकडून समाधान व्यक्त होत आहे.
काही वेळेस ऑनलाईन तिकीट घेताना काही तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे पूर्वापार व्यवहारासाठी वाहकांचा अट्टाहास दिसून येतो . आजकाल सर्वाकडे मोबाईल असतो त्यामुळे ऑनलाईन तिकीट विक्री प्रवासी व वाहकांसाठी फायदेशीर ठरत आहे .