कोल्हापूर :संगीत सूर्य नाट्यगृह केशवराव भोसले लावणी कार्यक्रमासाठी मिळावे अशी मागणी लावणी रसिकांनी महानगरपालिका येथे केले होती , ठरल्याप्रमाणे महापालिकेकडून लावणी संदर्भात हरकती मागवण्यात आल्या होत्या मागवलेल्या हरकतीपैकी 390 हरकती लावणीसाठी असुन त्यावर लोकांनी सह्या सुद्धा केल्या आहेत. कोल्हापूरमध्ये गेली आठ वर्ष केशवराव भोसले नाट्यगृहावर बंदी आहे ,इतर ठिकाणी नाट्यगृह उपलब्ध नाही त्यामुळे लावणी कार्यक्रम बंद झाले आहेत नाट्यगृह मिळण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी केली ,त्यानुसार त्यांनी लावणीसाठी नागरिकांतून हरकती मागवण्याच्या सूचना महापालिकेला दिल्या , 720 हरकती प्राप्त झाल्या हरकतीवर सह्या लावणीच्या बाजूला असून सुद्धा महापालिका लावणीसाठी नाट्यगृह देण्यास टाळाटाळ करत आहे,या गोष्टीचा विचार करून नाट्यगृह उपलब्ध करून द्यावे अशी विनंती पालकमंत्र्यांना करण्यात आली. यावेळी सुरेश सदाशिव उलपे, नंदकुमार मजगे, धनंजय दामूगडे ,महेंद्र कांबळे ,इंद्रजीत जामदार, सदाशिव सरादे ,भारत कुंभार इत्यादी उपस्थित होते.