नाथजोगी समाजातील पहिली मुलगी झाली दहावी पास

परिस्थितीवर मात करून नाथजोगी समाजातील पहिली मुलगी दहावी पास झाली. मुलं कसंबसं शिक्षण घेत आहेत. मात्र, मुलींच्या शिक्षणाला या समाजात प्रचंड विरोध असताना रमाबाई चव्हाण हिने पहिल्याच प्रयत्नात तिनं दहावीत 61 टक्के गुण मिळवत पास झाली. शिकवणी तर दूर पण परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत पुस्तकही नसताना केवळ जिद्द, आत्मविश्वास आणि शाळेत शिक्षकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनावरच दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे.

घरात तर, सोडा समाजातही फारसं कुणी शिकलेलं नाही. अशा शिक्षणापासून कोसोदूर असणाऱ्या आणि पोटाच्या उदरनिर्वाहासाठी भिक्षा मागणाऱ्या आणि त्यासाठी सातत्यानं गावोगावं भटकंती करणाऱ्या नाथजोगी समाजातील पहिली मुलगी दहावी पास झाली. या समाजातील मुलं कसंबसं शिक्षण घेत आहेत. मात्र, मुलींच्या शिक्षणाला या समाजात प्रचंड विरोध असताना रमाबाई चव्हाण हिने पहिल्याच प्रयत्नात दहावीत 61 टक्के गुण घेत पास झाली.

शिकवणी तर दूरचं परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत पुस्तकही नसताना केवळ जिद्द, आत्मविश्वास आणि शाळेत शिक्षकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनावर दहावीची परीक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात पास झाली. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील कोदामेंढी या गावातील रमाबाई चव्हाण या मुलीने नाथजोगी समाजातील मुलींच्या शिक्षणाचा नवा अध्याय आता सुरु करण्यास मदत केली आहे. शहरी भागात पालक त्यांच्या पाल्यांसाठी खासगी शिकवणी लावून देतात. असं असताना शिक्षणाचा गंध नसणाऱ्या नाथजोगी समाजातील रमाबाईने मिळविलेले यश खरोखरचं सर्वांसाठी एक आदर्श उदाहरण ठरू शकते.

रमाबाई चव्हाण म्हणाली,  मी दहावीची परीक्षा द्यायला चालले होते माझ्याकडे पुस्तके नव्हती. रात्री 9 वाजता शिक्षकांनी आम्हाला पुस्तके आणून दिली. त्या पुस्तकावर अभ्यास करून मी दहावी पास झालो आहे. मला पुढे शिक्षण घ्यायचे आहे. मला माझ्या समजासाठी काहीतरी करायचे आहे. माझ्या समाजाचा विकास करायचा आहे. मला अजून पुढे जायचे आहे.