राधानगरी तालूक्यातील बारडवाडी येथे किरकोळ कारणावरूण मूलाने आईच्या डोक्यात खोरे घालून निर्घून खून केला. मालूबाई श्रीपती मूसळे वय 70 असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी तिचा मूलगा संदीप मूसळे य 35 याला राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना आज दूपारी दोन वाजण्याच्या सूमारास सूतार मळा नावाच्या शेतात घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी कि, संदीप मूसळे त्याची आई मालूबाई मूसळे व त्यांचे नातेवाईक हे सूतार मळा नावाच्या शेतात भाताची टोकणी करण्यासाठी शेतातील साफसफाई करण्यासाठी दूपारी गेले होते. यावेळी किरकोळ कारणावरून संदीप मूसळे व तिची आई मालूबाई मूसळे यांच्या वाद झाला. या वादातून संदीप यांने आपल्या आईच्या ङोक्यात खोऱ्याचा मोठा घाव घातला. यामध्ये ती रक्तबंबाळ होऊन जागीच ठार झाली. ही घटना समझताच राधानगरी पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली व तिचा पंचनामा केल्यानंतर मूतदेह शवविच्छदनासाठी सोळांकूर येथील ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.
या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पोलिस निरिक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश रेडीकर, कूष्णात खामकर, कूष्णात यादव, किरण पाटील तपास करत आहेत.