देशांमधील ‘या’ राज्यांमध्ये पार पडतोय मतदानाचा 6 वा टप्पा

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यासाठी आज, शनिवारी सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. दिल्लीतील सर्व सात आणि हरियाणातील सर्व दहा जागांवर मतदान होणार असून सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. सकाळी सात वाजता मतदान सुरु झालं आहे.

या ५८ मतदारसंघांमध्ये ११.१३ कोटी मतदार असून ५.८४ कोटी पुरुष व ५.२९ कोटी महिला मतदारांचा समोवश आहे. निवडणूक आयोगाने १.१४ लाख मतदान केंद्रांवर सुमारे ११.४० लाख मतदान अधिकारी तैनात केले आहेत. सध्या देशाच्या अनेक भागांत तीव्र उकाडा जाणवत असून आधीच्या टप्प्यांमध्ये मतदारांना उन्हाचा त्रास झाल्याने निवडणूक आयोगाने निवडणूक अधिकारी व राज्य यंत्रणांना पुरेशा उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

मतदानाचा सहावा टप्पा देशात पार पडतो आहे. आतापर्यंत कुठे किती टक्के मतदान झालं

बिहार – २३.६७ टक्के

हरियाणा-२२.०९ टक्के

जम्मू-काश्मीर- २३ टक्के

झारखंड – २७.८० टक्के

एनसिटी आणि दिल्ली- २१.६९ टक्के

उत्तर प्रदेश – २७ टक्के

पश्चिम बंगाल – ३६.८८ टक्के