आयपीएल 2024 च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये संजू सॅमसनच्या संघाला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. आता या सामन्यानंतर बीसीसीआयने राजस्थानच्या स्टार खेळाडूवर कारवाई केली आहे. एका चुकीमुळे बीसीसीआयने या खेळाडूविरुद्ध हे मोठं पाऊल उचललं.
राजस्थान आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात झालेल्या क्वालिफायर 2 सामन्यात आरआरला एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. हैदराबादने राजस्थानसमोर विजयासाठी 176 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे आरआरला गाठता आले नाही. यादरम्यान आरआरचा स्टार खेळाडू शिमरॉन हेटमायरला फटका बसला. त्याने आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन होईल असे कृत्य केले. बीसीसीआयने शिमरॉन हेटमायरला मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावला. सतत पडणाऱ्या विकेट्समुळे हेटमायर त्रस्त झाला होता, पण तोही 10 चेंडूत केवळ 4 धावा करून बाद झाला. आणि आऊट झाल्यानंतर त्याने रागात बॅट आपटले.
सनरायझर्स हैदराबादने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता आयपीएल 2024 चा अंतिम सामना हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना चेपॉक स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. याबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. हैदराबादने ही ट्रॉफी जिंकल्यास त्याची ही दुसरी ट्रॉफी असेल. दुसरीकडे, कोलकाताने ही ट्रॉफी जिंकल्यास त्यांच्यासाठी ही तिसरी ट्रॉफी असेल. याआधीही केकेआरने गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दोनदा ट्रॉफी जिंकली होती.