निवासी शाळेत बारावीच्या विद्यार्थ्यांची आत्महत्या

पन्हाळ्याच्या पायथ्याशी असलेल्या एका निवासी शाळेतील बारावीत प्रवेश घेतलेल्या अभय हणमंत देवकाते (वय १७) बारामती याने सुसाईड नोट लिहुन ठेवत शाळेतच गळफास घेवून आत्महत्या केली.

अभय हा पाचगणी येथील शाळेत शिकत होता.  येथील शाळा बंद पडल्याने त्याच्या पालकांनी त्याचा पन्हाळा येथील निवासी शाळेत प्रवेश घेतला. शाळेत प्रवेश घेवुन अवघे चारच दिवस झाले होते. गेले दोन दिवस तो आपल्या वहीत काहीतरी लिहीत बसलेला असायचा.

मृत्यूनंतर पन्हाळा पोलीसांनी ती वही ताब्यात घेतली. त्याचे पाचगणी शाळेतील जुने मित्र व प्रेम प्रकरणातून आत्महत्या करत असल्याचे लिहुन ठेवल्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी सांगितले. या बाबतीत गुन्हा नोंद झाला असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश इंगळे करत आहेत.

🤙 9921334545