पी. एन. पाटील यांच्या आठवणीने आ. सतेज पाटील झाले भावूक

स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील हे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाल्याची माहिती कळताच तातडीने परदेशातून परतीच्या प्रवासाला निघालेले आ.सतेज ( बंटी) पाटील ३० तासांचा सलग प्रवास करून आज कोल्हापूरात पोहोचले.


पहाटे ३ वाजता मुंबईमध्ये पोहोचताच ते लगेच कोल्हापूरला यायला निघाले आणि थेट सडोली खालसा येथे पी.एन .पाटील साहेब यांच्या रक्षाविसर्जनासाठी उपस्थित राहिले. राहुल पाटील आणि राजेश पाटील यांना आलिंगन देऊन सांत्वन करताना आ. सतेज पाटील यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.