आतड्यांचे आरोग्य सुदृढ राहणे निरोगी शरीरासाठी गरजेचे आहे. जर आतड्यांचे आरोग्य चांगले असेल तर आपली रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहते, पण अनेकदा आपण आतड्यांच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही आणि आरोग्याच्या समस्या स्वत:हून अंगावर ओढावून घेतो. आज आपण आल्याचा उपयोग जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी आपण आतड्यांच्या आरोग्याचे महत्त्व समजून घेऊया.
“आपल्या आतड्यांमध्ये असंख्य चांगले बॅक्टेरिया असतात जे रोगप्रतिकारशक्ती, पचनक्रिया आणि जवळपास सर्व महत्त्वाच्या शारीरिक क्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. चांगले बॅक्टेरिया हे आपल्या आरोग्यासाठी आवश्यक असतात.”