राज्यात पाचव्या टप्प्यासाठी आतापर्यंत 48.66 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज (20 मे) मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 13, तर देशातील एकूण 49 जागांवर मतदान होत आहे. तर सहावा टप्पा 25 मे रोजी 7 राज्यातील 57 जागांवर, शेवटच्या सातव्या टप्प्याचं मतदान 1 जून रोजी पार पडणार आहे.

महाराष्ट्रात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण अशा एकूण 13 मतदारसंघांत मतदान सुरू आहे. यासाठी मोठ्या संख्येने मतदार घराबाहेर पडले तर अनेक दिग्गज नेत्यांबरोबर अभिनेत्यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. सहा वाजता मतदान केंद्राच्या आवारात असणाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून टोकन देण्यात येणार असून सर्वांचे मतदान करून घेतले जाणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात 48.66 टक्के मतदान झाले असून देशभरात 56.68% मतदान झाले आहे.

राज्यात आतापर्यंत 48.66 टक्के मतदान झालं आहे.
धुळे – 48.81 %
दिंडोरी – 57.06 %
नाशिक – 51.16 %
पालघर – 54.32 %
भिवंडी – 48.89 %
कल्याण – 41.70 %
ठाणे – 45.38 %
मुंबई उत्तर – 46.91 %
मुंबई उत्तर पश्चिम – 49.79 %
मुंबई उत्तर पूर्व – 48.67 %
मुंबई उत्तर मध्य – 47.32 %
मुंबई दक्षिण मध्य – 48.26 %
मुंबई दक्षिण – 44.22 %