कोल्हापूर : कोल्हापूर शहर, पन्हाळा तालुक्यासह जिल्ह्यातील विविध भागांत अचानक आलेल्या पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला. जोतिबा रोड परिसरात तासांहून अधिक काळ धगफुटीसदृश्य पाऊस सुरू होता. याच भागात झाड मोटारीवर कोसळले. त्यामध्ये काही प्रवाशी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अलीकडे कोल्हापुरात उष्मा वाढला होता. मोठ्या पावसाची अपेक्षा केली जात होती. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. कोल्हापूर शहर, करवीर, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ तालुक्यात मुसळधार पाऊस तासभर झाल्याचे स्थानिक नागरिकांतून बोलले जात आहे. तर अनेक भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.