कोल्हापूर : काँग्रेसचे करवीर तालुक्यातील आमदार पी.एन.पाटील ह्यांना गेली दोन दिवस झाले कमी रक्तदाबाचा त्रास सुरू होता. त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या होत्या, त्या चाचण्यामध्ये काही दोष आढळून आले नव्हते. तरीही आज सकाळी ते बाथरूम मध्ये गेले असता कमी रक्तदाबाचा त्रास होऊन घसरून पडल्यामुळे त्यांच्या हातास व डोक्यास मारलागल्यामुळे कोल्हापूर येथील अस्टर आधार मध्ये त्यांना तातडीने उपचारा करता दाखल करण्यात आले. यावेळी मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांना पाचरण करून तातडीने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे दवाखान्याच्या प्रशासनाने सांगितले आहे. यावेळी त्यांच्यावर प्रेम करणारे भागातील विविध संघटना व पक्ष यांचे कार्यकर्ते यांचे दवाखाना परिसरामध्ये तुफान गर्दी करीत असल्याचे दिसून येत आहे.