पाडळी खुर्द मध्ये टेम्पोस मोटरसायकलची धडक, एक जण जागीच ठार.

बालिंगा, ता. करवीर : येथे भंगार गोळा कराणारा टेम्पो थांबला होता. त्यास मोटरसायकलने धडक दिल्याने भाऊसाहेब कृष्णात पाटील कोगेकर वय ४८ हे जागीच ठार झाले.

याबाबत समजलेली माहिती अशी की, फुलेवाडी येथील विष्णू सुभाष गोसावी रा. फुलेवाडी ६ वा बस स्टॉप हे टेम्पो घेऊन भंगार गोळा करणेसाठी पाडळी खुर्द गावामध्ये गेले होते त्यांचा टेम्पो रस्त्याच्या कडेला थांबलेला असताना समोरून भरधाव मोटरसायकल वरून मोबाईलवर बोलत भाऊसाहेब पाटील हे येत होते. अचानक मोटरसायकल वरील त्यांचा ताबा सुटला व ते सरळ जाऊन थांबलेल्या टेम्पोस धडकले यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सदर घटनेची नोंद करवीर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.