भिजवलेले बदाम खाण्याचे फायदे

आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणं गरजेचे असते.  सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण रात्रीचे जेवण वेळेवर करणे गरजेचे असते. अनेक लोक सकाळी रिकाम्या पोटी काही गोष्टी खाण्याचा सल्ला देतात त्यात भिजवलेल्या बदामाचं समावेश होतो. बदामामध्ये प्रथिने अँटी औक्सिडंट्स असतात . शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी बदाम खाणे फायद्याचे ठरते.

बदाम रात्री भिजत घालून सकाळी पोट साफ झाल्यनानंतर ते सोलून खाल्याने त्याचा शरीराला जास्त फायदा होतो. नियमित ४ बदाम खाल्ले तरी पुष्कळ होते. नियमित भिजवलेले बदाम खाल्ल्याने चयापचय वाढते आणि शरीरातील चरबी जलद बर्न होते. बदामांमध्ये उच्च फायबर, चरबी आणि कमी कार्बोहायड्रेट्स असतात. यासह, त्यामध्ये ग्लूकोजचे प्रमाण बरेच कमी असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास खूप उपयुक्त ठरते.

भिजवलेल्या बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि ए जास्त प्रमाणात असते. व्हिटॅमिन ई त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करते तर व्हिटॅमिन ई त्वचेतील कोलेजन वाढविण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा थंड आणि चमकदार होते. बदाम खाल्ल्याने बुद्धी तीष्ण होते. स्मरणशक्ती सुधारण्यास मदत होते.याशिवाय अल्झायमर सारख्या मेंदूच्या समस्या कमी करण्यासाठी प्रभावी ठरते.