हार्दिक पांड्या आयपीएलमध्ये ट्रॉफी जिंकणारा कर्णधार : गौतम गंभीर

भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटर गौतम गंभीर त्याच्या रोखठोक विधानामुळे कायम चर्चेत असतो. गौतम गंभीरने आता दक्षिण अफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्सवर निशाणा साधला आहे. एबी डिव्हिलियर्स आणि केविन पीटरसन यांनी मुंबईच्या फ्लॉप कामगिरीसाठी हार्दिक पांड्याच्या खराब कर्णधाराला जबाबदार धरले. पण गौतम गंभीर हार्दिक पांड्याच्या समर्थनार्थ मैदानात उतरला आहे.

गौतम गंभीर हार्दिक पांड्याच्या बाजून उभा राहिला आणि म्हणाला की, एबी डिव्हिलियर्सने देखील संघाचे नेतृत्व केले आहे आणि कर्णधार म्हणून त्याची कामगिरी कशी आहे. गौतम गंभीरच्या मते, डिव्हिलियर्स आणि केविन पीटरसनचा कर्णधारपदाचा रेकॉर्ड इतर नेत्यांच्या तुलनेत खूपच खराब आहे. डिव्हिलियर्सने क्वचितच आयपीएलमध्ये कर्णधारपद भूषवले आहे आणि कर्णधार असतानाही त्याने वैयक्तिक कामगिरीशिवाय दुसरे काही मिळवले नाही, असा प्रश्न गंभीरने उपस्थित केला. हार्दिक पांड्या हा आयपीएलमध्ये ट्रॉफी जिंकणारा कर्णधार आहे. त्यामुळे संत्र्याची तुलना सफरचंदाशी न करता संत्र्याशी करावी, असा सल्ला गंभीरने दिला.

हार्दिक पांड्या स्वत:ला धोनीप्रमाणं शांत आणि संयमी समजतो मात्र तसं नाही. हार्दिक पांड्याची नेतृत्त्वशैली गुजरात टायटन्स सारख्या नवख्या खेळाडूंपुढं योग्य ठरु शकते. मात्र, ज्या मुंबई इंडियन्समध्ये रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह सारखे वरिष्ठ खेळाडू आहेत. तोपर्यंत अशी नेतृत्त्व शैली योग्य ठरत नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वशैली धाडसीपणा आहे, मात्र त्यामध्ये अहंकार आहे. मला वाटतं मैदानावर जे घडतं ते वास्तव असतं. मात्र, त्यानं ठरवलंय त्याच्या नेतृत्त्वाची शैली अशीच आहे. धोनी प्रमाणं नेतृत्त्व करण्याचा त्याचा प्रयत्न असतो, असं डिव्हिलियर्स म्हणाला होता.

गौतम गंभीर आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यातील या शब्दयुद्धात लोक दोन गटात विभागले गेले आहेत. काही जण म्हणतात की गंभीरने आयसीसी टूर्नामेंटच्या अंतिम सामन्यांमध्ये खूप धावा केल्या आहेत, त्याच्याकडे 2 आयसीसी ट्रॉफी आहेत आणि आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून चॅम्पियन देखील आहे. त्याचवेळी काही चाहत्यांचे म्हणणे आहे की, डिव्हिलियर्ससमोर गौतम गंभीर काहीच नाहीय, कारण भारतातील लोकांना डिव्हिलियर्स जास्त आवडतो.