टिटवेत ग्रामोझोन पिल्याने युवकाचा मृत्यू

कोल्हापूर : टिटवे ( ता राधानगरी) येथील सचिन महादेव कांबळे वय २१ याने ग्रामोझोन नावाचे विषारी औषध प्राशन केल्याने आज दुपारी त्याचा कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात मृत्यू झाला.

काल संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास गैबी नावाच्या शेतात ग्रामोझोन नावाचे विषारी औषध प्राशन केलं होते. त्यानंतर त्याने आपल्या मोबाइलवरूनच या घटनेची माहिती नातेवाईकांना दिली . नातेवाईकांनी  त्वरितच त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात  दाखल केले होते. आज दुपारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तरी औषध प्राशन कारण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.  त्याच्या पश्चात आई वडील असा परिवार आहे.