युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपतींच्या कोवाड येथील महिला मेळाव्यास मोठी गर्दी

चंदगड : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारानिमित्त युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती चंदगड तालुक्यातील गावागावात पोहचत आहेत. त्यांच्या उपस्थिती कोवाड येथे महिला मेळावा पार पडला. यावेळी चंदगडच्या कोवाड व परिसरातील महिलांनी ‘ यावेळी फक्त शाहू छत्रपती महाराजच ‘ असा निर्धार केला.

यावेळी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, मराठा आरक्षण चळवळीत संभाजीराजे २००७ पासून राज्यभर फिरत आहेत. मराठा समाजाच्या मागाण्यांसाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण केले आणि ६ मागण्या मान्य करून घेतल्या. जरागेंच्या गावातील सभेवर अमानुष लाठीचार्ज झाला तेव्हा रातोरात संभाजीराजे निघाले आणि त्यांची भेट घेऊन तुमच्या पाठीशी असल्याचे ठामपणे सांगितले. उपोषण सुरु केले तेव्हा स्वतः शाहू छत्रपती जरागेंना भेटले तेव्हा छत्रपतींचा मान म्हणून महाराजांच्या हस्ते ते पाणी प्यायले. जिल्ह्यात जातीय दंगल झाली तेव्हा सलोखा राखण्यासाठी शाहू छत्रपती पुढे आले.

२०१९ ला महापूर काळात राजवाडा परिसरातील लोकांना शाहू छत्रपतींनी राहण्याची सोय केली. जनावरांच्या चऱ्याची सोय केली, इतकेच काय त्या जनावरांचे दूध विकणे शक्य नव्हते म्हणून स्वतः ते सर्व दूध विकत घेतले. संभाजीराजेंनी फेसबुकवरून कोल्हापूर – सांगली मदतीसाठी आवाहन केले तेव्हा ३७० हून अधिक ट्रक धान्य व वस्तूरूपात आले. प्रतिकूल परिस्थितीतही स्वतः संभाजीराजे नौदलाच्या विमानात बसून एनडीआरएफच्या जवानांसोबत दिल्लीहून कोल्हापूरला आले होते. १२ तुकड्यातील एक कोवाड येथे पाठविली होती. ज्या ज्या वेळी अडचणी आल्या त्या त्या वेळी छत्रपती घराणे धावून आले.

कोवाडच्या सरपंच अनिता भोगण म्हणाल्या, शाहू छत्रपतींची उमदेवारी ही सर्वांना उत्तेजित करणारी आहे. हे घराणे अत्यन्त संस्कारक्षम आहे. शाहू छत्रपती हे निगर्वी असून त्यांच्यात श्रीमंतीचा अहंकर अजिबात नाही. महिलांचा सन्मान यापुढेही ते आपल्या कार्यातून अधिक जोमाने करतील. नारीशक्तीची ताकद महाराजांच्या पाठीशी असून विजयासाठी महिला घराघरात पोहचतील.

गोपाळराव पाटील यांच्या स्नुषा शीतल पाटील व माजी जि. प सदस्य कल्लापाण्णा भोगण यांनी, ही निवडणूक जनतेने हाती घेतली असून शाहू छत्रपतींच्या विजयासाठी महिलांही सक्रिय योगदान देतील. हुकूमशाही रोखण्यासाठी, नागरिकांचे हक्क अबाधित राखण्यासाठी काँग्रेसचा हात विजयी करा असे आवाहन केले.

यावेळी माजी जि. प. सदस्या सुजाता पाटील, शांताताई जाधव, माजी सरपंच विष्णु आढाव, एम. जे. पाटील, लक्ष्मण मनवाडकर, पांडुरंग जाधव, नारायण कलूकले, विनोद पाटील, रवींद्र पाटील, जे के पाटील, अक्षय करंबळकर, सागर पाटील, संतोष गावडे आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.