खा. धैर्यशील माने यांच्या विजयासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करा : मंत्री हसन मुश्रीफ

हातकणंगले / प्रतिनिधी : विकासाची दृष्टी असलेला आणि खऱ्या अर्थाने मतदार संघाला विकासाच्या वेगळ्या उंचीवर नेवुन ठेवणारा युवा खासदार धैर्यशील माने यांच्या विजयासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी करा . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी श्री . माने यांना पुन्हा खासदार करण्याचे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. आळते (ता. हातकणंगले) येथे महायुतीचे उमेदवार खास . धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते . अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य अरुणराव इंगवले होते .

पालकमंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, गेल्या दहा वर्षात पंतप्रधान मोदी यांनी भारताला विकसित राष्ट्रामध्ये नेले आहे. त्यांच्या काळात चार कोटी दहा लाख लोकांना पक्की घरे दिली . दहा कोटी महिलांपर्यंत उज्ज्वला गॅस योजना पोहचवली. बारा कोटी घरांमध्ये शौचालय बांधून दिली . ऐशी कोटी जनतेला मोफत धान्य वाटप सुरु आहे . समस्त भारत वासीयांचे स्वप्न असलेल्या प्रभु श्रीराम मंदीर उभारले. यासारख्या अनेक विकास कामांच्या माध्यमातून देशात अर्थव्यवस्था पाचव्या क्रंमाकावर आणली आहे.


माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले, महिला व शेतकऱ्यांना सन्मान देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे . देशाला परदेशात सन्मान मिळवून देण्याचे आणि परदेशातील भारतीयांच्या हातात तिरंगा झेंडा उंचाविण्याची ताकद मोदींनी दिली आहे . मोदींना पंतप्रधान करणेसाठी आणि त्यांचे हात बळकट करण्यासाठी खास. धैर्यशील मानेंना परत एकदा खासदार करणेचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी खास . धैर्यशील माने , माजी आम. सुरेशराव हळवणकर, माजी जि .प . सदस्य अरुणराव इंगवले आदिनी मनोगत व्यक्त केले . आळतेचे सरपंच अजिंक्य इंगवले यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर माजी . जि .प . अशोकराव माने यांनी आभार मानले .
मेळाव्यास वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष हिंदुराव शेळके , जवाहरचे व्हा. चेअरमन् बाबासाहेब चौगुले, वारणा संघाचे संचालक अरुण पाटील , बाजार समितीचे संचालक किरणराव इंगवले , अशोक पाटील, संभाजी पोवार, बबलु मकानदार, आळतेचे उपसरपंच अमित पाटील हातकणंगलेचे भाजपचे सर्व नगरसेवक , यांच्यासह कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .