वाकरे / प्रतिनिधी : अविष्कार फौंडेशन मार्फत महिला दिनानिमित्त दिला जाणारा सन २०२४ चा ‘राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ पुरस्कार’ खुपिरे (ता. करवीर) येथील सौ. उज्वला बाबुराव कारंडे यांना सामाजिक व महिला सबलीकरण क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सोलापूर येथील हि.ने. वाचनालयामधील लोकमान्य टिळक सभागृहात आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सचिन वायकुळे तर प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे हे उपस्थित होते. यावेळी अविष्कार फाउंडेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय पवार, जिल्हाध्यक्ष जब्बार शिकलगार, जिल्हा सेक्रेटरी ए. बी. शेख व इतर मान्यवर उपस्थित होते.