सतिश वडणगेकर यांच्या कल्पनेतून स्वामी समर्थ विविध रूपात

कोल्हापूर (प्रतिनिधी): श्री स्वामी समर्थ प्रकट दिन 10 एप्रिल रोजी होणार असून विविध मंदिर, मंडळ बरोबर घरगुती ही या प्रकट दिनानिमित्त अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये भजन कीर्तन नामस्मरण अशा अनेक प्रकारेने स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा केला जातो.

भक्तांच्या कल्पनेत स्वामी समर्थांचे अनेक रूप वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. हे कल्पना साकारण्याचे काम कोल्हापूर येथील शाहूपुरी कुंभार गल्लीतील सतिश वडणगेकर या व्यक्तीने गेले वीस वर्ष श्री स्वामी समर्थ यांच्या काचेची फ्रेम असलेल्या फोटो च्या प्रतिमेला भक्तांच्या आणि आपल्या कल्पनेने श्री स्वामी समर्थांना विविध रूपाने आज सुद्धा सजवत आहेत.

यामध्ये श्री स्वामी समर्थ च्या रूपाबरोबर बाळूमामा, चिले महाराज, दत्तावतार, जय मल्हार ,ज्योतिबा, शंकर महाराज,श्रीपाद वल्लभ ,गजानन महाराज,नरसिंह सरस्वती, महादेव ,पांडुरंग, तुळजाभवानी, विष्णू,गणपती,साईबाबा अशा अनेक रूपाने वॉटर कलर मध्ये ते स्वामी समर्थांना सजवत आहेत. त्यांच्या या कलेमुळे त्यांना मागणी खूप आहे.सतिश वडणगेकर यांना कोल्हापूर बरोबर इतर शहरातून जिल्ह्यातून आमंत्रित केले जाते. निस्वार्थी भक्ती भावाने ते हे काम करत असतात.

ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या फेऱ्यात, अमोल कीर्तीकर यांना चौकशीसाठी समन्स