म्हारुळ गावच्या सरपंच पदी शिवसेना (शिंदे, नरके) गटाच्या सौ अलका पाटील…

बहिरेश्वर प्रतिनिधी..
करवीर तालुक्यातील मौजे म्हारुळ गावची 2021/22 सालची ग्रामपंचायत निवडणूक पहिल्यांदाच दुध संस्था कर्मचारी संघटनांच्या पूढाकाराने बिनविरोध करण्यात आली होती… बिनविरोध पाच वर्षांत पाच सरपंच व पाच उपसरपंच असा फाॅर्म्यूला निश्चित करण्यात आला होता.त्यानुसार रोटेशन प्रमाणे श्रीमती शालाबाई गूरव यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागी शिवसेना शिंदे नरके गटाच्या सौ अलका सरदार पाटील यांनी सरपंच पदासाठी एकमेव अर्ज दाखल केला.. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सांगरूळ बीटचे मंडलाधिकारी सूहास घोदे यांनी काम पाहिले. एकमेव अर्ज दाखल असलेल्या सौ.अलका पाटील यांचे नाव सरपंच पदासाठी घोषित केले.. निवडीनंतर मावळत्या सरपंच श्रीमती शालाबाई गूरव यांचे हस्ते सौ पाटील यांचा पूष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला.त्यानंतर माजी उपसरपंच सागर चौगले, एकनाथ चौगले,आनंदा शिंदे आदींनी सरपंचांना शुभेच्छा दिल्या व आपली मनोगते व्यक्त केली.निवडीनंतर पाटील समर्थकांनी गुलालाची उधळण करीत फटाक्याची आतिषबाजी केली..
यावेळी गावातील कृषीसहायक पदी शिक्षक पदी आणि विशेष अधिकारी पदी निवड झालेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी ग्रामसेवक पी एस मेंगाणे,तलाठी सूवर्णा भोईर,उपसरपंच राजाराम कुंभार, सरदार पाटील,सागर चौगले,प्रकाश कांबळे,वंदना म्हाकवेकर,रेखा कुंभार,रूपाली चौगले, तंटामुक्त अध्यक्ष रंगराव पाटील, राजाराम पाटील, तानाजी पाटील, नामदेव पाटील,भरत सुतार, सरदार पाटील, सर्जेराव चौगले,दादासो पाटील,मोहन चौगले, संभाजी पाटील, प्रल्हाद खामकर, महादेव पाटील, कृष्णात चौगले, शिवाजी पाटील,सिंग्राप्पा पाटील, सखाराम पाटील आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते