कोल्हापूर : जील्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या प्रभारी कार्यकारी अभियंतापदी वैजनाथ कराड हे नुकतेच रुजू झाले . त्यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा नुकताच कार्यभार स्वीकारला. कराड सध्या राधानगरी पंचायत समितीमध्ये उपअभियंता म्हणून कार्यरत असून, चंदगड तालुक्याचाही अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे आहे.
जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांची बदली केल्यानंतर त्यांच्या जागी प्रभारी कार्यकारी अभियंता म्हणून बारटक्के यांची सहा महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली होती. बारटक्के यांच्या तब्येतीच्या तक्रारी असल्याने त्यांनी आठ दिवसांपूर्वी त्यांना रजा दिली आहे. प्रशासनाच्या वतीने ज्येष्ठतेनुसार प्रभारी कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार स्वीकारण्यासंबंधी उपअभियंत्यांना विचारले. परंतु, त्यांनी नकार दिला, त्यामुळे कराड यांची नियुक्ती करण्यात आली.